टीममधून वगळल्यानंतर इशान किशन हा एकच प्रश्न स्वत:ला विचारत राहिला, त्याचं उत्तर अखेर मिळालं

इशान किशनचं टीम इंडियात दोन वर्षांनी पुनरागमन झालं आहे. डिसेंबर 2023 पासून टीम इंडियातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळत होता. या काळात टीम इंडियात परतण्यासाठी फक्त एकच प्रश्न स्वत:ला विचारत होता.

| Updated on: Jan 24, 2026 | 4:49 PM
1 / 5
इशान किशनला टीम इंडियात अखेर स्थान मिळालं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत जवळपास अडीच वर्षांनी परतला आहे. यावेळी दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo- PTI)

2 / 5
पहिल्या टी20 सामन्यात इशान किशन अपयशी ठरला. पण दुसऱ्या सामन्यात त्याने धावांची वसुली केली. त्याने 32 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तसेच विजयात मोलाचा वाटा दिला. (Photo- PTI)

3 / 5
इशान किशनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्याला  संघातून वगळल्यानंतर स्वत:ला काय विचारायचा? असा प्रश्न केला गेला. तेव्हा इशानने सांगितलं की, स्वत:ला फक्त एकच प्रश्न विचारत होतो की मी संघात परतू शकतो की नाही? आणि मला त्याचं योग्य उत्तर मिळालं होतं. (Photo- PTI)

4 / 5
इशान किशनने सांगितलं की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करण्यावर लक्ष केंद्रीत केल होतं. त्याने पुढे सांगितलं की, 'कधी कधी स्वत:साठी करणं आवश्यक असतं, कारण तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर हवी असतात. कशी बॅटिंग होत आहे आणि टीम इंडियात खेळण्याच्या लायक आहात की नाही.'(Photo- PTI)

5 / 5
डावखुरा विकेटकीपर फलंदाज इशान किशन डिसेंबर 2023 पासून टीम इंडियातून बाहेर होता. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडल्यानंतर त्याला पुन्हा संघात संधी मिळाली नाही. दोन वर्षे त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष केला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 500हून अधिक धावा केल्यानंतर संघात स्थान मिळालं. (Photo- PTI)