वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बुमराहने रचला विक्रम, भारतात अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान गोलंदाज

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 162 धावांवर आटोपला. तर टीम इंडिया पहिल्या डावात आघाडी घेईल अशी स्थिती आहे. असं असताना जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

| Updated on: Oct 02, 2025 | 6:01 PM
1 / 5
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा डाव 162 धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सिराज आणि बुमराहची भेदक गोलंदाजी अनुभवायला मिळाली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या. त्याने जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लेयान या फलंदाजांना बाद केले.  पहिल्याच कसोटी सामन्यात 14 षटकांत 42 धावा देत एकूण 3 गडी बाद केले. दोघांना तर त्याचा यॉर्कर चेंडूत कळला नाही.  (Photo- BCCI Twitter)

3 / 5
बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय भूमीवर 50 विकेट्स पूर्ण केल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घरच्या मैदानावर 50 विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. या आधी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 149 आणि रवींद्र जडेजाने 94 विकेट घेतल्या आहेत.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
जसप्रीत बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घरच्या मैदानावर एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 50 विकेट्स घेतल्या आहेत.  एका डावात 45 धावा देऊन 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.  (Photo- BCCI Twitter)

5 / 5
जसप्रीत बुमराहने घरच्या मैदानावर 50 विकेट घेण्यासाठी फक्त 1747 चेंडू घेतले. जसप्रीत बुमराहने घरच्या मैदानावर 50 कसोटी बळींचा टप्पा गाठला आणि वेगवाग गोलंदाज जवागल श्रीनाथची बरोबरी केली. जवागल श्रीनाथ आणि जसप्रीत बुमराह यांनी 24 डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे. (Photo- BCCI Twitter)