
इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 74 षटकांचा सामना करत 9 गडी गमवून 325 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रूट नाबाद 135 आणि जोफ्रा आर्चर नाबाद 32 धावांवर खेळत आहे. (Photo- England Cricket Twitter)

शतकी खेळीसह जो रूटच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. 2002 मध्ये अॅडेली ओव्हल येथे इंग्लंडच्या मायकेल वॉनने केलेल्या 177 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या जो रूटने 135 धावा केल्यात. (Photo- ICC Twitter)

पिंक बॉल कसोटीच्या इतिहासात पहिल्या डावात 300हून अधिक धावा केलेला संघ कधीही पराभूत झालेला नाही. त्यामुळे इंग्लंडकडे दुसऱ्या कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या दिवशी किती धावा करणार याकडे लक्ष लागून आहे. (Photo- England Cricket Twitter)

पिंक बॉल टेस्टमध्ये शेवटच्या विकेट जो रूट आणि जोफ्रा आर्चर यांनी विक्रमी भागीदारी केली. 2023 मध्ये माउंट मौंगानुई येथे टॉम ब्लंडेल आणि ब्लेअर टिकनर यांनी 59 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक 10व्या विकेटसाठी मोठी भागीदारी आहे. (Photo- ICC Twitter)

पिंक बॉल कसोटीमध्ये एका दिवसाच्या खेळात इंग्लंडने तिसऱ्यांदा सर्वाधिक धावा केल्या आहे. 2017 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 348, 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 325 आणि आता 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 325 धावा केल्या आहेत. (Photo- ICC Twitter)