IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा POTM जिंकणारे कर्णधार, श्रेयस अय्यर कितव्या स्थानी?

Most POTM Awards in IPL: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. श्रेयसने या खास यादीत दिग्गज सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं आहे. जाणून घ्या

Sanjay patil | Updated on: May 24, 2026 | 10:48 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात नेतृत्वाच्या जबाबदारीसह बॅटिंग किंवा बॉलिंगने योगदान देणारे असंख्य कर्णधार आहेत. मात्र यात आघाडीवर असलेले मोजकेच कर्णधार आहेत. पंजाबने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध विजय मिळवला. श्रेयस अय्यर याने शतक करुन पंजाबच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. श्रेयसने यासह दिग्गज सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं. (Photo Credit: PTI)

2 / 5

श्रेयस पंजाब विरुद्ध मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला. श्रेयसची कर्णधार म्हणून हा पुरस्कार जिंकण्याची आठवी वेळ ठरली. श्रेयसने यासह सचिनला मागे टाकलं. सचिनने कर्णधार म्हणून 7 वेळा अशी कामगिरी केली होती. (Photo Credit: PTI)

3 / 5

तसेच श्रेयसने सचिनला पछाडण्यासह वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांची बरोबरी केली आहे. वॉर्नर आणि सेहवाग या दोघांनी प्रत्येकी 8-8 वेळा सामनावीर होण्याचा बहुमान मिळवला होता. (Photo Credit: PTI)

4 / 5

तसेच कर्णधार म्हणून सर्वाधिक 17 वेळा potm पुरस्कार जिंकण्याचा विक्रम हा महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे. तर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर 13 potm सह दुसऱ्या स्थानी आहेत. (Photo Credit: PTI)

5 / 5

विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी आहे. विराटने कॅप्टन म्हणून 11 वेळा potm पुरस्कार जिंकला आहे. तर केएल राहुल कॅप्टन म्हणून 9 potm सह पाचव्या स्थानी आहे. (Photo Credit: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us