IPL 2025 : सूर्यकुमार यादवचा महारेकॉर्ड, टी 20 क्रिकेटमध्ये घडवला इतिहास, ठरला पहिलाच बॅट्समन

Suryakumar Yadav Record : सूर्यकुमार यादव याने वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चाबूक खेळी केली. सूर्याने 73 रन्स केल्या. सूर्याने यासह इतिहास घडवला. सूर्याने टी 20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला. जाणून घ्या.

| Updated on: May 21, 2025 | 11:56 PM
1 / 5
मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने इतिहास घडवला आहे. सूर्यकुमारआधी कोणत्याच भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. सूर्यकुमारने टेम्बा बावुमाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सूर्याला आयपीएल 2025 मध्ये शतक करता आलं नाही. मात्र सूर्याने सातत्यपूर्ण खेळी करत मोठा कारानामा केला आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

2 / 5
टी 20 क्रिकेटमध्ये टेम्बा बावुमा याने सलग 13 डावांमध्ये किमान 25 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.  टेम्बाने 2019 ते 2020 दरम्यान ही कामगिरी केली होती. मात्र सूर्याने एकाच वर्षाच्या कालावधीतच टेम्बा बावुमाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

3 / 5
सूर्यकुमार यादव एका वर्षात सलग सर्वाधिक वेळा 25 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) खेळलेल्या प्रत्येक सामन्यात किमान 25 धावा केल्या आहेत. सूर्या यासह अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय तर एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

4 / 5
सूर्यकुमारने दिल्ली विरुद्ध 25 धावा करताच  आपल्या नावे  विक्रम केला. आता सूर्याने पुढील सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 25 धावा केल्या तर तो अशी कामगिरी करणारा जगातला पहिला फलंदाज ठरेल. सूर्या सध्या ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता तो पंजाब विरुद्ध सहज ही कामगिरी करेल, असा चाहत्यांना विश्वास आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

5 / 5
सूर्याने दिल्ली विरुद्ध 43 बॉलमध्ये 169.77 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 73 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 4 खणखणीत षटकार लगावले. तसेच सूर्याच्या या खेळीत 7 चौकारांचाही समावेश होता. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)