खरंच की काय…! आयपीएल 2025 स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात नवीन उल हकचा आरसीबीमध्ये प्रवेश?

आयपीएल 2025 स्पर्धेतील उर्वरित सामने शनिवारपासून सुरु होणार आहेत. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये स्थगितीनंतर पहिला सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स 17 मे रोजी आमनेसामने येणार आहेत. असं असताना काही विदेशी खेळाडूंना स्पर्धेतून काढता पाय घेतला आहे. आता त्याऐवजी तात्पुरत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे.

| Updated on: May 15, 2025 | 7:57 PM
1 / 6
आयपीएल 2025 स्पर्धा स्थगितीनंतर 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. पण क्रिकेटचं वेळापत्रक लांबल्याने काही विदेशी खेळाडूंनी काढता पाय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याचं नावही या यादीत आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 6
खांद्याच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाजी जोश हेझलवूड उर्वरित सामन्यात खेळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करण्यासाठी आरसीबी फ्रेंचायझीकडून शोधाशोध सुरु झाल्याची चर्चा आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 6
त्यामुळे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकचा आरसीबी संघात समावेश झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. जोश हेझलवूडच्या जागी नवीन-उल-हकला आरसीबीने निवडल्याचे फोटोही समोर आले आहेत. (Photo: IPL/BCCI)

4 / 6
नवीन उल हकची संघात खरंच निवड झाली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर चर्चा होत असलेली बातमी खोटी आहे. कारण जोश हेझलवूड उर्वरित सामन्यात खेळणार नाही याबाबत आरसीबीने अधिकृतरित्या काहीच सांगितलेलं नाही.

5 / 6
नवीन उल हक 2023 मध्ये लखनौ सुपरजायंट संघात दिसला होता. आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यादरम्यान नवीन उल हकचे विराट कोहलीशी भांडण झाले होते. गुजरातने आरसीबीला पराभूत केल्यानंतर नवीन उल हकने सोशल मीडियावर एका आंब्याचा फोटो शेअर केला होता.

6 / 6
जोश हेझलवूडच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फ्रँचायझी नवीन उल हक याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. जर हेझलवूड आता उपलब्ध नसेल, तर आरसीबी फ्रँचायझी त्याच्या जागी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांकडे वळण्याची शक्यता आहे. (Photo: IPL/BCCI)