
भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या मालिकेत त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. खासकरून मेलबर्न कसोटी सामना हातून निसटत असताना त्यात जीव ओतला. अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतावरील फॉलोऑनचं संकट टाळलं.

नितीश कुमार रेड्डीने या खेळीत मारलेला षटकार खास ठरला. या षटकाराच्या जोरावर नितीशने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. या मालिकेत आठव्यांदा नितीश कुमारने षटकार ठोकला आहे.

नितीश कुमार रेड्डीने या षटकारासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याची बरोबरी कली आहे. दुसरीकडे, एकाच मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. मायकल वॉनने 2002-03 एशेज मालिकेत 8 षटकार मारले होते. तर ख्रिस गेलने 2009-10 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 8 षटकार मारले होते.

नितीश कुमार रेड्डीने बॉर्डर गावस्कर 2024-25 स्पर्धेत 200 हून अधिक धावा केल्या आहेत. या मालिकेत 200 धावांचा आकडा गाठणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल हे खेळाडू देखील 200हून अधिक धावा करणारे फलंदाज आहेत.

नितीश कुमार रेड्डी या मालिकेत पाचव्यांदा 30+ धावा करण्यास यशस्वी ठरला आहे. सातव्या क्रमांकावर किंवा त्या खाली फलंदाजीला उतरून पाचवेळा 30+ धावा करण्याची ही भारतीय फलंदाजाची चौथी वेळ आहे.