
पाकिस्तान संघाचा ओपनर साहिबजादा फरहान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. असा विक्रम कोणत्याही क्रीडाप्रेमीला नकोसाच असतो. पण पाकिस्तानी संघ नको त्या पंगतीत पहिल्या स्थानावर बसला आहे. (Photo- PTI)

वर्ष 2025 ते आतापर्यंत पाकिस्तानचे 12 ओपनर शून्यावर बाद झाले आहेत. हा एक नकोसा विक्रम आहे. त्यामुळेच पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तान एकमेव संघ असा आहे की त्याचे ओपनर फलंदाज 10 पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झाले आहेत. (Photo- PTI)

पाकिस्ताननंतर दुसरा क्रमांक लागतो तो बांगलादेशचा.. या संघाचे ओपनर 8 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या ओपनरचा नंबर लागतो. दक्षिण अफ्रिकेचे ओपनर 6 वेळा शून्यावर बाद झाले आहे. चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचे ओपनर असून पाच वेळा शून्यावर बाद झाले आहेत. (Photo- PTI)

भारत आणि इंग्लंड या संघातील ओपनर संयुक्तरित्या 4-4वेळा शून्यावर बाद झाले आहेत. हे दोन्ही संघ संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहेत. खरं तर हा विक्रम भारतासाठीही भूषावह नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. (Photo- PTI)

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 22 धावांनी नमवलं. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. (Photo- PTI)