
नीरज चोप्राने पात्रता फेरीत जबरदस्त कामगिरी केली. पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीट लांब भाला फेकत अंतिम सामन्यात स्थान पक्कं केलं आहे. पात्रता फेरीत आतापर्यंतच्या भारतीय भालाफेकपटूची ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

नीरज चोप्राने या पर्वात 89.34 मीटर लांब भाला फेकला. या थ्रोसह 90 मीटरच्या जवळ येऊन पोहोचला आहे. नीरज चोप्राने आपल्या कारकिर्दित 89.94 मीटर लांब भाला फेकला आहे. त्यामुळे फायनलमध्ये 90 मीटर लांब भाला फेकेल अशी अपेक्षा आहे.

टोक्यो ऑलिम्पिकनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. अशी कामगिरी करताच ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदकं मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. तर एथलेटिक्समध्ये दुसरं पदक मिळणारा पहिला भारतीय म्हणूनही मान मिळेल.

नीरज चोप्राला अंतिम सामन्यात पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमचं आव्हान असणार आहे. त्यानेही पात्रता फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. नदीमने 86.59 मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरी गाठली.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू 8 ऑगस्टला आमनेसामने येणार आहेत. नीरज चोप्रा सुवर्ण पदकच आणणार असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे.