IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पहिल्याच विजयात मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला टाकलं मागे, कसं ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेचा रंग आता आणखी रंगत जाणार आहे. आता तीन सामन्यांचा खेळ संपला असून गुणतालिकेत चुरस निर्माण झाली आहे. आरसीबी आणि मुंबईला मागे टाकत राजस्थान रॉयल्स संघ आघाडीवर पोहोचला आहे.

आयपीएल 2023 स्पर्धेत एकूण तीन सामन्यांचा खेळ संपला असून सहा संघाची शर्यत सुरू झाली आहे. सहा संघांमध्ये राजस्थान रॉयल्स, आरसीबी आणि मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली आहे. मात्र पहिल्या सामन्यात आरसीबी आणि मुंबईपेक्षा राजस्थानचा संघ वरचढ ठरला आहे. (Photo- IPL Twitter)

आरसीबीने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 6 गडी राखून पराभूत केलं. तर मुंबई इंडियन्सने केकेआरने विजयासाठी दिलेल्या 221 धावा सहज गाठल्या. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभवाची धूळ चारली आणि पहिलं स्थान गाठलं. (Photo- IPL Twitter)

राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. कारण त्यांनी चेन्नई सुपर किंग्सने दिलेले 128 धावांचं आव्हान 12.1 षटकात पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्सने 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा नेट रनरेट हा +4.171 इतका झाला आहे. (Photo- IPL Twitter)

सनरायझर्स हैदराबादने आरसीबीसमोर विजयासाठी 202 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण हे लक्ष्य आरसीबीने 15.4 षटकात 6 गडी राखून पूर्ण केलं. त्यामुळे आरसीबीला दोन गुण तर मिळाले, तसेच नेट रनरेट हा +2.907 राहिला. आरसीबी आणि राजस्थान यांच्यात नेट रनरेटमध्ये +1.264 इतका फरक आहे. (Photo- IPL Twitter)

मुंबई इंडियन्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सने 221 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य मुंबई इंडियन्सने 19.1 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे मुंबईच्या खात्यात दोन गुण गेले. पण नेट रनरेट हा राजस्थान आणि आरसीबीच्या तुलनेत कमी आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +0.687 इतका आहे. (Photo- IPL Twitter)