IND vs SA Test: रवींद्र जडेजाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध रचला मोठा विक्रम, असं करणारा दुसरा गोलंदाज

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. पाचव्या दिवशी भारताचा पराभव निश्चित असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. असं असताना रवींद्र जडेजाने 4 विकेट घेत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एक मोठा कारनामा केला आहे.

Updated on: Nov 25, 2025 | 4:35 PM
1 / 5
गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिका विजय मिळवणार हे जवळपास निश्चित आहे. यासाठी त्यांना पाचव्या दिवशी आठ विकेट काढायच्या आहेत.  चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 गडी गमवून 27 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात रवींद्र जडेडाने 28.3 षटकात 62 धावा देत 4 गडी बाद केले आहेत.  यासह त्याने या सामन्यात भारताचा पराभव दृष्टीक्षेपात असताना एका विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.  (Photo- BCCI Twitter)

3 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्यांनी 40 डावात 54 विकेट घेतल्या आहे.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
जवागल श्रीनाथने 25 डावात 64, हरभजन सिंगने 19 डावात 60, आर अश्विनने 26 डावात 57 विकेट घेतल्या आहेत. तर जडेजाने 19 डावात 50 विकेट घेतल्या आहेत.   (Photo- BCCI Twitter)

5 / 5
रवींद्र जडेजा आता भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत आर. अश्विन अव्वल स्थानी असून सात सामन्यांमध्ये 46 बळी घेतले आहेत. जडेजाने नऊ सामन्यांमध्ये 44 बळी घेतले आहेत, तर कुंबळेने नऊ सामन्यांमध्ये 39 बळी घेतले आहेत.  (Photo- BCCI Twitter)