Ravindra Jadeja : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू विरुद्ध खेळतोय. चेन्नईमध्ये सुरु असलेल्या सामन्यात जाडेजा सौराष्ट्राच नेतृत्व करतोय.
Ravindra-jadeja
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू विरुद्ध खेळतोय. चेन्नईमध्ये सुरु असलेल्या सामन्यात जाडेजा सौराष्ट्राच नेतृत्व करतोय. जाडेजासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण गुडघ्याच्या दुखापतीनंतर त्याचा हा पहिला सामना आहे. (PC-GETTY)
जाडेजाने या मॅचमध्ये आधी बॉलिंग केली. त्याने 24 ओव्हरमध्ये 48 रन्स देऊन एक विकेट काढला. हा ऑलराऊंडर खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात उतरला, त्यावेळी अपेक्षित नव्हतं, असं त्याच्यासोबत घडलं. (PC-GETTY)
रवींद्र जाडेजा या सामन्यात 15 रन्स करुन आऊट झाला. जाडेजाने चांगली सुरुवात केली होती. त्याने तीन सुंदर चौकार मारले. पण बाबा अपराजितच्या चेंडूवर तो आऊट झाला. तो LBW बाद झाला. (PC-GETTY)
रवींद्र जाडेजाने या सामन्यात चांगली बॅटिंग केली असती, तर त्याला त्याचा आत्मविश्वास परत मिळाला असता. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळायची आहे. जाडेजाला त्याआधी सूर सापडणं आवश्यक आहे. (PC-GETTY)
रवींद्र जाडेजाला आशिया कप स्पर्धे दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकला नाही. टीम इंडियाला आता जाडेजाच्या जागी अक्षर पटेलच्या रुपात चांगला पर्याय मिळालाय.