
आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पॉवर प्लेमध्ये आरसीबीला 55 धावांवर रोखलं हे विशेष (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

श्रेयस अय्यर म्हणाला की, हा एक अद्भुत दिवस आहे. गर्दी उत्साहवर्धक आहे. आपल्याला फक्त इथे येऊन आनंद घ्यायचा आहे. मुले उत्तम स्थितीत आणि मानसिकतेत आहेत. टीम मीटिंगमध्ये आपण फक्त एवढेच बोललो की तुम्ही जितके शांत राहाल तितके चांगले.हा अंतिम सामना आहे आणि आपण अंतिम सामन्यासारखा खेळणार आहोत. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

या पर्वात पंजाब किंग्सने 17 पैकी 12 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. यासह पंजाब किंग्सने यात पर्वात सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकण्याचा मान मिळवला आहे. तसेच तीन संघांशी बरोबरी साधली आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

आयपीएल 2013 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 12 वेळा नाणेफेक जिंकली होती. तर 2019 आयपीएल स्पर्धेत चेन्नईने 12 वेळा टॉस जिंकला होता. आता या यादीत पंजाब किंग्सचं नाव समाविष्ट झालं आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

आयपीएलच्या मागच्या 17 पर्वात अंतिम सामन्यांमधील नाणेफेकीनुसार सामन्याचा निकाल पाहिला तर 10 वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे पंजाब किंग्स संघ हे वर्चस्व राखू शकेल की नाही याकडे सर्वांच्या नजरा असतील. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)