इंग्लंडमध्ये दुसर्‍या शतकासह ऋषभ पंतने नोंदवला मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा सातवा फलंदाज

भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतने इंग्लंडमध्ये सलग दुसरं शतक ठोकलं आहे. एका सामन्यातील दोन डावात शतक ठोकत त्याने विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी अशी कामगिरी भारताच्या सहा फलंदाजांनी केली होती. आता यात ऋषभ पंतची भर पडली आहे.

| Updated on: Jun 23, 2025 | 8:22 PM
1 / 5
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने तडाकेबंद फलंदाजी केली. शुबमन गिलची विकेट पडल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला होता. मात्र ऋषभ पंतने शतक ठोकलं आणि भारताला अडचणीतून बाहेर काढलं.

2 / 5
ऋषभ पंतने 140 चेंडूंचा सामना करत 118 धावांची खेळी केली. यात त्याने 15 चौकार आणि 3 षटकार मारले. ऋषभ पंतचे हे आठवं कसोटी शतक आहे. तसेच एकाच सामन्यात दुसरं शतक आहे. पहिल्या डावातही त्याने शतकी खेळी केली होती.

3 / 5
इंग्लंडच्या भूमीवर सलग दोन डावात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी कोणालाही करता आली नव्हती. जागतिक पातळीवर दोन डावात शतक ठोकणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे.

4 / 5
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेटकीपर फलंदाज अँडी फ्लॉवरने दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा विक्रम केला होता. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2001 मध्ये पहिल्या डावात 141 आणि दुसऱ्या डावात नाबाद 199 धावा केल्या होत्या.  पण दुसऱ्या देशात जाऊन अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत हा पहिला विकेटकीपर फलंदाज आहे.

5 / 5
सलग दोन डावात शतक ठोकणारा सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि रोहित शर्माने अशी कामगिरी केली आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय ट्वीटर)