
बीसीसीआय निवड समितीने 4 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया या दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने त्याआधी वनडे टीमचा कॅप्टन बदलला. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या जागी युवा फलंदाज आणि टेस्ट कॅप्टन शुबमन गिल याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी दिली. या निमित्ताने आपण रोहितची वनडे कॅप्टन म्हणून आकडेवारी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

शुबमन कॅप्टन होताच आता भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात होणार आहे. रोहित आता एक खेळाडूच्या भूमिकेत असणार आहे. रोहितची 2021 साली एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. (Photo Credit: PTI)

रोहितने टीम इंडियाचं एकूण 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 56 पैकी 42 सामन्यांमध्ये विजयी केलं. तर फक्त 12 वेळाच पराभूत व्हावं लागलं. तसेच एक सामना बरोबरीत राहिला होता. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. (Photo Credit: PTI)

रोहितने भारताला त्याच्या नेतृत्वात एकूण 2 वेळा आशिया कप जिंकून दिला. भारताने रोहित कॅप्टन असताना 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit: Surjeet Yadav/Getty Images)

तसेच रोहितच्या नेतृत्वात भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा 12 वर्षांचा दुष्काळ संपवला. भारताने मार्च महिन्यात अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी चॅम्पिन्स 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारताने त्याआधी 23 जून 2013 रोजी इंग्लंडला पराभूत करत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. (Photo Credit: PTI)

तसेच रोहितच्याच नेतृत्वात भारताने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. (Photo Credit: PTI)