रोहित शर्मा-विराट कोहली जोडी 30 नोव्हेंबर मैदानात उतरताच रचणार विक्रम, काय ते जाणून घ्या

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामना संपल्यानंतर टीम इंडिया वनडे मालिकेसाठी सज्ज होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. 30 नोव्हेंबरपासून ही वनडे मालिका सुरु होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही मालिका खास असेल.

Updated on: Nov 25, 2025 | 5:21 PM
1 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे  मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. पहिला वनडे सामना 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच रोहित शर्मा आणि विराट कोहली विक्रम रचणार आहेत.  (Photo-PTI)

2 / 5
केएल राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नाणेफेक होताच प्लेइंग 11 मध्ये जागा दिली तर हा विक्रम रचला जाईल. 30 नोव्हेबरला मैदानात उतरताच रोहित विराट ही जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जोडीच्या विश्वविक्रमात सामील होतील.  (Photo-Getty Image)

3 / 5
हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल फेम राहुल द्रविड यांच्या नावावर आहे. सचिन-राहुल यांनी एकत्र 391 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यासह, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने एकत्र खेळण्याचा विश्वविक्रम रचला आहे. (Photo-Getty Image)

4 / 5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या विक्रमाची बरोबरी केली होती. आता विराट कोहली आणि रोहित शर्मा आता नवा इतिहास लिहिण्याच्या मार्गावर आहेत. हा त्यांचा एकत्रितपणे 392 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. (Photo-PTI)

5 / 5
रोहित शर्मा आणि विराट कोहली 30 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानावर उतरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने एकत्र खेळण्याचा विश्वविक्रम करतील. तसेच या जोडीला आगामी मालिकांद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 सामने एकत्र खेळण्याचा विक्रम रचण्याची संधी आहे. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. (Photo-Getty Image)