Sahibzada Farhan: साहिबजादाच्या शतकामुळे मोडला विश्वविक्रम, टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने 102 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने सुपर 8 फेरीत जागा मिळवली. या सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने 100 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे विजय सोपा झाला. तसेच एक मोठा विक्रम नावावर नोंदवला गेला.

| Updated on: Feb 18, 2026 | 7:13 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने नाबाद शतक ठोकलं. त्ायने 57 चेंडूत 100 धावा केल्या. यासह टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं. त्याची नोंद आता घेतली गेली आहे. (Photo- PTI)

2 / 5
पाथुम निस्संका आणि युवराज सामरानंतरटी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हे तिसरं शतक आहे. हे तिसरं शतक साहिबजादा फरहानच्या बॅटमधून आलं. यापूर्वी टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील एका पर्वात कधीच तीन शतकं झाली नव्हती.  युवराज सामराने 110 आणि निस्संकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या. (Photo- PTI)

3 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत 13 फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. यात ख्रिस गेल एकमेव असा खेळाडू आहे की, त्याने या स्पर्धेत दोन शतकं ठोकली आहे. त्याने 2007 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 117 धावांची खेळी केली होती. तर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाबद 100 धावा केल्या. (Photo- PTI)

4 / 5
भारताकडून आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकच शतक ठोकलं गेलं आहे. भारताकडून सुरेश रैनाने शतक ठोकलं आहे. त्याने 2010 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 101 केल्या होत्या. शतक ठोकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला होता. (Photo- PTI)

5 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम ब्रँडन मॅक्कलमच्या नावावर आहे. त्याने 2012 मध्ये बांगलादेशविरुद्ध 123 धावांची खेळी केली होती. (Photo- PTI)