संजू सॅमसनसाठी काय पण! पहिल्यांदाच असं घडणार, सामन्याआधीच चाहत्यांनी दिली भेट

भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. हा सामना टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पूर्वतयारीचा शेवटचा टप्पा आहे. तसेच संजू सॅमसनसाठीही महत्त्वाचा सामना असणार आहे.

| Updated on: Jan 29, 2026 | 8:50 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दृष्टीने भारताची तयारी चांगली झाली आहे. पण काही उणीवा न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत दिसून आल्या आहेत. खासकरून चौथ्या टी20 सामन्यात बरंच काही विपरीत घडलं. तर  संजू सॅमसनला या मालिकेत सूर काही गवसलेला नाही. (फोटो- PTI)

2 / 5
न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा टी20 सामना संजू सॅमसनसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण त्याच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी असणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरम्चाय ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय मैदानात असणार आहे. हा सामना संजू सॅमसनसाठी महत्त्वाचा असणार आहे. (फोटो- PTI)

3 / 5
संजू सॅमसन पहिल्यांदाच होम ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. या मैदानात संजू सॅमसन लहानपणापासून खेळत आहे. पण पहिल्यांदाच भारताच्या जर्सीत या मैदानात उरणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. (फोटो- PTI)

4 / 5
रिपोर्टनुसार, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानाची क्षमता जवळपास 55 हजार चाहत्यांची आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी इतका प्रेक्षकवर्ग असणार आहे. कारण या सामन्याची सर्व तिकीट विकली गेली आहेत. चाहते संजू सॅमसनला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत. (फोटो- PTI)

5 / 5
संजू सॅमसनने आतापर्यंत खेळलेल्या 4 डावात 40 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात 10 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात 6 धावा, तर तिसऱ्या सामन्यात खातंही खोलता आलं नव्हतं. चौथ्या सामन्यात त्याने 24 धावांची खेळी केली होती. आता त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.  (फोटो- PTI)