सारांश जैनचा कसोटी पदार्पणातील पहिला चेंडू ठरला खास, खरं तर नकोसा पण दिग्गजांच्या यादीत स्थान
भारत आणि श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सारांश जैनला संधी दिली गेली. कुलदीप यादवच्या जागी त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. असं असताना या कसोटी मालिकेतील पहिला चेंडू खास आणि नकोसा राहिला. त्याच्या कसोटी क्रिकेट कारकीर्द विचित्र प्रकारे सुरू झाली आहे.

कोलंबोत श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळाली. पण त्या या सामन्यात टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल होता. यासह त्याने निवडक खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. खरं तर या यादीत दिग्गज खेळाडू असून त्यांची सुरूवात अशीच झाली होती.(Photo: PTI)

आकडेवारीनुसार, सारांश जैन जगातील 15वा खेळाडू ठरला असून त्याने कसोटी क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात नो बॉल टाकून केली. म्हणजे कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीच्या सुरूवातीला नो बॉलचा ठपका लागला आहे. (Photo: PTI)

कसोटी क्रिकेट कारकिर्दीत नो बॉल टाकणार सारांश जैन चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. नो बॉलपासून कसोटी कारकिर्दीला सुरूवात करणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (Photo: PTI)

सारांश जैन याच्या आधी भारताच्या तीन गोलंदाजांनी नो बॉल टाकून कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली होती. यात कपिल देव, इशांत शर्मा आणि टी नटराजन यांचं नाव आहे. (Photo: PTI)

भारताच्या कसोटी संघात पदार्पण करणारा सारांश जैन हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यासह त्याने सबा करीमच्या नावावर असलेला 26 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सबा कमीने 32 वर्षे 11 महिने आणि 28 दिवसांचा असताना संघात पदार्पण केलं होतं. तर सारांश जैनने 33 वरषे 4 महिने आणि 24 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. (Photo: PTI)