
शुबमन गिलने टीम इंडियाच्या सूत्र हाती घेतल्यापासून जबरदस्त फॉर्मात आला आहे. त्याने या मालिकेत धावांचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत झालेल्या चारही कसोटीत त्यांनी चांगली कामगिरी केली. आता पाचव्या कसोटीत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo- BCCI)

ओव्हल कसोटी सामन्यात शुबमन गिलने गॅरी सोबर्स आणि सुनील गावस्कर या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. 2 धावा केल्या तेव्हा गॅरी सोबर्सला आणि 11 धावा केल्यानंतर सुनील गावस्करला मागे टाकलं आहे. यासह भारताचा नंबर 1 कर्णधार झाला आहे. (Photo- BCCI)

सुनील गावस्कर यंनी 1978-79 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध 732 धावा केल्या होत्या. आता गिल त्यांच्या पुढे निघून गेला आहे. इतकंच काय तर गिनलने SENA देशांविरुद्ध मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. (Photo- BCCI)

शुबमन गिल आणखी दोन मोठे विक्रम मोडू शकतो. सुनील गावस्कर यांनी एका मालिकेत 774 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी आता शुबमन गिलला खूप कमी धावा हव्या आहेत. (Photo- BCCI)

दुसरीकडे, गिलने 811 धावा केल्या तर तो डॉन ब्रॅडमनला मागे टाकेल. इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. हा विक्रम गेल्या 90 वर्षांपासून कायम आहे आणि आता गिल तो मोडू शकतो. (Photo- BCCI)