
वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. दहा संघ खेळणार असून पाच संघांनी खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या संघांचा समावेश आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत आयपीएलचा प्रभाव दिसून येणार आहे. वर्ल्डकपमध्ये आयपीएलमधील एकूण 6 कर्णधार उतरणार आहेत. यापैकी फक्त एकच कर्णधाराच्या भूमिकेत असेल. तो म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मा..रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच जेतेपद जिंकले आहेत.

रोहित शर्मा याच्या व्यतिरिक्त हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचाही वर्ल्डकप संघात समावेश आहे. या तिघांनी आयपीएलमध्ये संघांचं नेतृत्व केलं आहे. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिलं आहे. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना अपेक्षित यश मिळालं नाही.

वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये मार्करम याने सनरायजर्स हैदराबादची धुरा सांभाळली आहे. तर डेव्हिड वॉर्नर याच्याकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा होती.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकुर.