IPL 2025 : प्लेऑफपूर्वी आरसीबीचा जीव पडला भांड्यात, वेगवान गोलंदाजाला खेळण्यास मिळाला हिरवा कंदील

भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली होती. आता 17 मे पासून स्पर्धा सुरु होणार असून वेळापत्रक गुंतागुंतीचं झालं. विदेशी खेळाडूंनी इतर मालिकांसाठी आपल्या देशाला प्राधान्य देण्याचं ठरवलं. यामुळे फ्रेंचायझींची धावाधाव झाली आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डांना आयपीएलमधील खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्याची विनंती केली.

| Updated on: May 15, 2025 | 9:33 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धा स्थगितीनंतर पुन्हा सुरु होणार आहे. या स्पर्धेतील शेवटचे 17 सामने शनिवारीपासून सुरू होतील. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे.

2 / 5
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आरसीबी संघात सामील झाला होता. पण प्लेऑफ सामन्यांसाठी अनुपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. कारण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी करण्यासाठी 26 मे रोजी राष्ट्रीय संघात सामील व्हावे, अशी अधिसूचना दक्षिण अफ्रिका बोर्डाने काढली होती.

3 / 5
यामुळे फ्रेंचायझींचे धाबे दणाणले होते. अखेर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाशी यशस्वी चर्चा केली. बीसीसीआयच्या विनंतीनंतर दक्षिण आफ्रिकन बोर्डाने कसोटी संघाचे प्रशिक्षण शिबिर पुढे ढकललं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाने 3 जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सराव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

4 / 5
दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने आयपीएलमधील दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना संपूर्ण स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आरसीबीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी तीन लीग सामने आणि प्ले-ऑफ सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

5 / 5
गुजरात टायटन्सचा कागिसो रबाडा, पंजाब किंग्जचा मार्को यानसेन, मुंबई इंडियन्सचा रायल रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश हे देखील आयपीएल स्पर्धेच्या समाप्तीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील होतील. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)