6,6,6,6,6,6, Travis Head चा कारनामा, KKR विरुद्ध 6 बॉलमध्ये 6 सिक्स

IPL 2025 SRH vs KKR Travis Head : आयपीएलच्या 18 व्या मोसमातून बाहेर झालेल्या सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या मोहिमेतील शेवटच्या सामन्यात धमाका केला आहे. हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 278 धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने या सामन्यात 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले.

| Updated on: May 25, 2025 | 10:47 PM
1 / 6
आयपीएलच्या 18 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या साखळी फेरीतील शवेटच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. हैदराबादने या हंगामातील  68 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. यात  हेनरिक क्लासेन आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी सर्वाधिक योगदान दिलं. (Photo Credit : IPL/Bcci)

2 / 6
सनरायर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 278 धावा केल्या. हैदराबादला तिथवर पोहचवण्यासाठी हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने पाया रचला. हेड आणि शर्मा या सलामी जोडीने 92 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेकने 16 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. (Photo Credit : IPL/Bcci)

3 / 6
त्यानंतर अभिषेक आणि हेनरिक क्लासेन या जोडीने केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी मैदानात चारही बाजूला फटके मारुन केकेआरच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. (Photo Credit : IPL/Bcci)

4 / 6
ट्रेव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 83 रन्सची पार्टनरशीप केली. सुनील नरीन याने हेडला आऊट करत ही जोडी फोडली.  ट्रेव्हिस हेड याने 40 बॉलमध्ये 190 च्या स्ट्राईक रेटने 76 रन्स केल्या. हेडने या खेळीत 6 सिक्स आणि 6 फोर ठोकले. (Photo Credit : IPL/Bcci)

5 / 6
हेड आऊट झाल्यांनतर क्लासेन आणि ईशान किशन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 रन्सची पार्टनरशीप केली. इशान किशन 29 रन्स करुन आऊट झाला. (Photo Credit : IPL/Bcci)

6 / 6
तसेच क्लासेन आणि अनिकेत वर्मा ही जोडी नाबाद परतली. अनिकेतने 12 रन्स केल्या. तर क्लासेन 39 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 7 फोरसह नॉट आऊट 105 रन्स केल्या. क्लासेनचं हे आयपीएल कारकीर्दीतील दुसरं शतक ठरलं. तसेच क्लासेनने 37 बॉलमध्ये शतक ठोकत डेव्हीड मिलर आणि ट्रेव्हिस हेड या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केला. क्लासेन यासह आयपीएल इतिहासात संयुक्तरित्या तिसरं वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला. क्लासेनने याबाबतीत युसूफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी केली.  (Photo Credit : IPL/Bcci)