IPL 2026: नाणेफेकीचा कौल झाला आणि सुनील नरेनच्या नावावर विक्रमाची नोंद, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल केकेआरने गमावला. पण सुनील नरेनने या सामन्यात विक्रम नोंदवला आहे. काय ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 29, 2026 | 8:33 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले. आता दुसऱ्या सामन्यातही हाच धागा पुढे ओढला जात आहे. यावेळी नाणेफेकीचा कौल होताच केकेआरचा अष्टपैलू सुनील नरेनने विक्रमाची नोंद केली आहे.

2 / 5
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सचे कर्णधार नाणेफेकीच्या कौल करण्यासाठी मैदानात उतरले. हा कौल मुंबईच्या बाजूने लागला. त्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्लेइंग 11 ची घोषणा केली.  त्यानंतर  सुनील नरेनच्या नावावर विक्रम नोंदवला गेला.

3 / 5
सुनील नरेनचं नाव प्लेइंग 11 असल्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा विदेशी खेळाडू ठरला आहे. हा त्याचा 190वा आयपीएल सामना आहे. यापूर्वी हा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर होता.

4 / 5
नरेन या सामन्यापूर्वी 189 सामन्यात 192 विकेट काढल्या आहेत. तर 1780 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे नरेन केकेआरसाठी इतके सारे सामने खेळला आहे.

5 / 5
आयपीएल स्पर्धेत सुनील नरेननंतर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने 189 सामने खेळले आहेत. तर दक्षिण अफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 184 सामने खेळले आहेत. पण दोन्ही खेळाडू आता स्पर्धेचा भाग नाहीत. त्यामुळे नरीनकडे सामन्यांचं द्विशतक ठोकण्याची संधी आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us