
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा प्रवास आता संपलेला आहे. 20 संघांपैकी 12 संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 8 संघ उपांत्य फेरीतील जागेसाठी लढणार आहे.

सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे चार संघ आहे. या गटात प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत. तीन पैकी तीन सामने जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

सुपर 8 फेरीच्या गट 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे चार संघ आहेत. या चार संघात उपांत्य फेरीच्या दोन जागांसाठी लढत होणार आहे. हे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे.

सुपर 8 फेरीतील गट 1 हा अपराजित गट आहे. कारण या गटात असलेल्या चारही संघाने साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. भारत, दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांनी साखळी फेरीत चारही सामने जिंकले आहेत.

सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये स्पर्धा अतितटीची असणार आहे. गट 2 मध्येही तशीच स्थिती आहे. पण या चारही संघांनी साखळी फेरीत एक एक सामना गमावला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण जागा मिळवते याची उत्सुकता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)