Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची यंगिस्तान किती सज्ज? पाहा 4 खेळाडूंचे आकडे

Asia Cup 2025 Team India : आशिया कप 2025 स्पर्धेआधी निवड समितीसमोर भारतीय संघात कुणाला संधी द्याची आणि कुणाला नाही? हा मोठा पेच आहे. भारताच्या 5 युवा फलंदाजांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. या 5 फलंदाजांमध्ये कुणी चौकारांबाबत आघाडीवर आहे, तर कुणी धावांबाबत सरस आहे. जाणून घ्या.

| Updated on: Aug 17, 2025 | 10:05 PM
1 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताला 2024 मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित-विराट यांच्यानंतर यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, आणि तिलक वर्मा या फलंदाजांनी आपली छाप सोडली. तसेच या खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान कायम केलं. (Photo Credit : PTI)

2 / 7
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. निवड समिती या 5 पैकी 4 खेळाडूंना संधी देऊ शकते.  त्या 4 खेळाडूंची आकडेवारी जाणून घेऊयात. (Photo Credit : Getty Images)

3 / 7
विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने 4 खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक सामने खेळले आहेत. संजूने 42 टी 20I सामन्यांमध्ये 861 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा याचा बॅटिंग एव्हरेज 49.93 सह इतरांपेक्षा सरस आहे.  तर अभिषेक शर्मा 193.84 च्या स्ट्राईक रेटसह आणि 135 धावांच्या सर्वोच्च खेळीसह आघाडीवर आहे. (Photo Credit : PTI)

4 / 7
यशस्वीने टी 20 मध्ये सर्वाधिक 81 चौकार लगावले आहेत. तर संजू सॅमसन 49 षटकारांसह आघाडीवर आहे. अभिषेकने  फटकेबाजी करत भारतासाठी विक्रमी 135 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 7
भारताने जुलैमध्ये टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर झिंबाब्वे विरुद्ध पहिली टी 20I मालिका खेळली होती. अभिषेकने त्या मालिकेतून टी 20I पदार्पण केलं होतं. अभिषेकने तेव्हापासून टी 20I कारकीर्दीतील 17 सामन्यांमध्ये 41 षटकार आणि 46 चौकारांच्या मदतीने एकूण 535 धावा केल्या आहेत. तिलकची सरासरी ही 82.60 इतकी आहे. तर समॅसनने सर्वाधिक 3 शतकं ठोकली आहेत. (Photo Credit : PTI)

6 / 7
अभिषेकने 2 फेब्रुवारी 2025 रोजी इंग्लंड विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये 54 चेंडूत 135 धावांची खेळी केली होती. अभिषेक यासह भारतासाठी टी 20I मध्ये एका डावात सर्वाधक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.(Photo Credit : PTI)

7 / 7
तसेच या पाचही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपल्या संघांसाठी चमकदार कामगिरी केली. शुबमनने 62 चौकारांच्या मदतीने 650 धावा केल्या. शुबमनने 50 च्या सरासरीने या धावा केल्या. तर यशस्वीने 6 अर्धशतकं आणि 28 षटकारांसह सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo Credit : PTI)