अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. पण आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. भारतीय फलंदाजांनी एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. 46 वर्षानंतर भारतीय फलंदाजांनी एकाच मालिकेत 11 शतकं झळकावली आहे. (Photo- BCCI)

इंग्लंडविरुद्ध लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (101), शुबमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी शतके झळकावली. दुसऱ्या डावात केएल राहुल (137) आणि ऋषभ पंत (118) यांनी शतके झळकावली.(Photo- BCCI)

बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिल (269) ने द्विशतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या डावात 161 धावा करून त्याने नवा इतिहास रचला. त्याचप्रमाणे, लंडनमधील लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुल (100) ने टीम इंडियासाठी शतक झळकावले. (Photo- BCCI)

1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकूण 11 शतके झळकावून एक विक्रम रचला होता. चार सामन्यांत भारताच्या युवा फलंदाजांनी एकूण 11 शतके झळकावली आहेत. चार दशकांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. केनिंग्टन ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शतक झळकावले तर एक नवीन इतिहास रचला जाईल.(Photo- BCCI)