
वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान पार पडणार आहे. भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडियात असा एक खेळाडू आहे, जो नंबर 1 ते 11 पर्यंत कुठेही खेळण्यास समर्थ आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 2 विकेटकीपर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. केएल राहुल आणि ईशान किशन अशी या दोघांनी नावं आहेत. मात्र प्लेईंग ईलव्हनमध्ये दोघांपैकी एकालाच संधी देता येईल. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला डच्चू देत कुणाला संधी द्यायची असा प्रश्न कॅप्टन रोहितसमोर आहे.

ईशान किशन याने आशिया कप साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया संकटात असताना निर्णायक खेळी केली. दुर्देवाने हा सामना रद्द झाला. मात्र ईशानने आपण कोणत्याही स्थानी खेळू शकतो, हे सिद्ध करुन दाखवलं. ईशान या सामन्यात बॅटिंगसाठी पाचव्या क्रमांकावर उतरला होता.

केएल राहुल याची अजून मैदानात एन्ट्री झालेली नाही. केएलची निवड होऊनही तो पूर्णपणे फीट नसल्याने पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध खेळू शकला नाही. टीम इंडिया सुपर 4 मधील पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. केएलला या सामन्यातून कमबॅक करताना विकेटकीपिंग आणि बॅटिंग करणं आव्हानात्मक ठरु शकतं. त्यामुळे ईशानलाच संधी मिळण्याची शक्यता आहे.

ईशान ओपनिंगही करु शकतो. तसेच तो पाचव्या स्थानी ही धमाका करु शकतो. ईशानला ओपनिंगचा पर्याप्त अनुभव आहे. ईशान पाकिस्तान विरुद्ध पाचव्या स्थानी खेळला होता.

ईशानने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. ईशानने आतापर्यंत 2 कसोटी, 19 वनडे आणि 29 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.