
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दोनदा स्थान मिळवलं आहे. पण जेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील भारताचा प्रवास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून होणार आहे.

भारत या स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहे. यात तीन भारतात आणि तीन परदेशात असणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत जाणार असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे.

जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहेत.

ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

साखळीतील शेवटची मालिका भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. पहिल्या मालिकेतील निकालानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. (All Photo : BCCI)