टीम इंडियासाठी 358 धावा अशुभ! यापूर्वीही बसलाय असा फटका; निव्वळ योगायोग म्हणावं की…

दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 4 विकेट राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 359 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. तसेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

Updated on: Dec 04, 2025 | 1:54 PM
1 / 5
वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं. भारताने विजयासाठी दिलेलं 359 धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी सावध खेळी करत भारतीय गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. (Photo: PTI)

2 / 5
भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावांचा डोंगर रचला, या धावसंख्येत विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकी खेळीचं योगदान होतं. इतकी मोठी धावसंख्या करूनही पराभव झाल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत. (Photo: PTI)

3 / 5
भारताला विजयासाठी दिलेल्या 359 धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमने शतकी खेळी केली. जीवनदान मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला.  मॅथ्यू ब्रेट्झकी आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनीही दमदार अर्धशतके झळकावली. या खेळीमुळे विजय सोपा झाला.  (Photo: PTI)

4 / 5
टीम इंडियाने भारतात खेळताना 350पेक्षा जास्त धावा करून पराभूत होण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन्ही वेळेस 358 धावा करून पराभव झाला हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. त्यामुळे 358 धावा भारतासाठी अशुभ आहेत अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. (Photo: PTI)

5 / 5
2019 च्या सुरुवातीला मोहाली वनडेमध्ये टीम इंडियाने 358 धावा केल्या होत्या. पण पीटर हँड्सकॉम्बच्या शतक आणि अ‍ॅश्टन टर्नरच्या स्फोटक नाबाद 84 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. निव्वळ योगायोग म्हणावं की काय? दोन्ही संघांनी 4 गडी राखून हा विजय मिळवला. (Photo: PTI)