
भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. टीम इंडियाची विंडीज विरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची सलग 10 वेळ ठरली. भारताने दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतील विजयासह दिल्लीतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडियाचा दिल्लीतील हा सलग 14 वा कसोटी विजय ठरला. भारत 1987 पासून दिल्लीत अजिंक्य आहेत. तसेच भारताने मोहालीत सलग 13 कसोटी सामने जिंकले आहेत. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाचा शुबमन गिल याच्या नेतृत्वातील आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिला मालिका विजय ठरला. भारताने याआधी शुबमनच्या नेतृत्वातील 5 सामन्यांची पहिली कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. (Photo Credit : PTI)

भारतीय संघाने विंडीजला पराभूत करुन आपला विक्रम आणखी मजबूत केला आहे. टीम इंडिया विंडीज विरुद्ध 1994 पासून अजिंक्य आहे. टीम इंडियाने या दरम्यान 10 कसोटी सामने जिंकले आहेत. तर विंडीजला 2 सामने अनिर्णित सोडवण्यात यश आलंय. (Photo Credit: PTI)

तसेच टीम इंडियाने विंडीजला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आपला 122 वा विजय मिळवला आणि 121 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलं. (Photo Credit: PTI)