Rohit vs Dhoni : धोनी-रोहितपैकी सरस कॅप्टन कोण? अशी आहे आकडेवारी

Rohit Sharma vs MS Dhoni Odi Captaincy Stats : महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा हे भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहेत. मात्र या दोघांपैकी भारी कोण? जाणून घ्या आकडेवारी काय सांगते.

| Updated on: Oct 06, 2025 | 7:23 PM
1 / 7
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली. शुबमनला रोहित शर्मा याच्या जागी नियुक्त करण्यात आलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून शुबमन पर्वाला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने आपण रोहित शर्माची एकदिवसीय कर्णधार म्हणून आकडेवारी कशी राहिलीय? हे जाणून घेऊयात. तसेच रोहित आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यापैकी सरस कॅप्टन कोण? हे जाणून घेऊयात.  (Photo Credit : PTI)

2 / 7
महेंद्रसिंह धोनी याने बरीच वर्ष भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व केलं. मात्र त्यानंतरही धोनीची विजयी टक्केवारी ही रोहितपेक्षा कमी आहे. धोनीची विजयी टक्केवारी ही 55 इतकी राहिली. (Photo Credit : Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images)

3 / 7
रोहितची वनडे कॅप्टन म्हणून कारकीर्द ही जवळपास 4 वर्षांची राहिली. रोहितला धोनीच्या तुलनेत 1 तृतीयांश कमी सामन्यात नेतृ्त्व करण्याची संधी मिळाली. मात्र रोहितची विजयी टक्केवारी ही 75 अशी आहे. (Photo Credit : PTI)

4 / 7
धोनीने भारतीय संघाचं 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. भारताचा त्यापैकी 110 सामन्यांमध्ये विजय झाला. तर 74 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. (Photo Credit: MI News/NurPhoto via Getty Images)

5 / 7
रोहितने टीम इंडियाची 56 वनडे मॅचेसमध्ये कॅप्टन्सी केली. रोहितने भारताला 56 पैकी 42 मॅचेसमध्ये विजयी केलं. तर 12 वेळा पराभूत व्हावं लागलं. (Photo Credit : Tv9)

6 / 7
धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 2007 साली टी 20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. तसेच धोनीच्या कॅप्टन्सीत भारताने 2016 साली आशिया कपवर नाव कोरलं होतं. (Photo Credit : Tv9)

7 / 7
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने 2024 साली टी 20i वर्ल्ड कप पटकावला. त्यानंतर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. तसेच रोहितने भारताला 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकून दिला. तसेच रोहितच्या नेतृत्वात भारताला वनडे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रनरअप म्हणून समाधान मानावं लागलं. रोहितने भारताला धोनीपेक्षा अधिक सामने जिंकून दिलेत. मात्र धोनीने भारताला आयसीसीच्या 3 ट्रॉफी मिळवून दिल्या. तर रोहितने भारताला आयसीसीच्या  2 स्पर्धेत विजयी केलं. त्यामुळे दोघांपेक्षा सरस कोण असं सांगणं धाडसाचं ठरेल. (Photo Credit : PTI)