
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. यशस्वीने तो रिकव्हर होत असून लवकरच मैदानात कमबॅक करेल, अशी माहिती चाहत्यांना दिली आहे. (Photo Credit : Instagram)

यशस्वीने त्याच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन तब्येतीबाबत माहिती दिली. यशस्वीला पुण्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध हरयाणा सामन्यादरम्यान रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर यशस्वीला गॅस्ट्रोएंटेरायटिस असल्याचं स्पष्ट झालं होतं. (Photo Credit : Instagram)

यशस्वीला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यशस्वीला डॉक्टरांनी काही दिवस न खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच यशस्वीला विश्रांती करण्यास म्हटलं होतं. (Photo Credit : Instagram)

यशस्वीने त्याला उपचारादरम्यान मिळालेल्या सुविधेसाठी वैद्यकीय पथकाचं कौतुक केलं. तसेच यशस्वीने मेडीकल स्टाफचे आभार मानले. तसेच यशस्वीने त्याच्या तब्येतासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. (Photo Credit : Instagram)

यशस्वी आता न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo Credit : Instagram)