आयपीएल 2025 प्लेऑफमध्ये हे चार संघ मिळवणार जागा! पियुष चावलाने वर्तवलं धक्कादायक भाकीत

IPL 2025 Playoff Prediction: आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत या स्पर्धेतून तीन संघ आऊट झाले आहेत. तर टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी सात संघांमध्ये चुरस आहे. या सात संघापैकी कोणते चार संघ टॉप 4 मध्ये जागा मिळवतील? याबाबतचं भाकीत माजी क्रिकेटपटू पियुष चावलाने केलं आहे.

| Updated on: May 06, 2025 | 3:14 PM
1 / 6
आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आहेत. 55 सामन्यांचा खेळ संपल्यानंतर तीन संघ आऊट झाले आहेत. मात्र अजूनही प्लेऑफसाठी एकही संघ कन्फर्म झालेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर पंजाब किंग्ज दुसऱ्या, मुंबई इंडियन्स तिसऱ्या आणि गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर आहेत.

2 / 6
लखनौ सुपरजायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे येत्या काही सामन्यात काहीही होऊ शकतं. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पियुष चावला याने प्लेऑफमध्ये खेळतील अशा सात संघांपैकी चार संघांची नावे जाहीर केली आहेत. यातून अव्वल स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

3 / 6
पियुष चावला यांच्या मते, यावेळी गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचेल हे निश्चित आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे. संघ इतर सर्व संघांना मागे टाकून प्लेऑफमध्ये पोहोचेल असा चावला यांचा विश्वास आहे.(Photo- IPL/BCCI)

4 / 6
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ देखील प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. दिल्ली कॅपिटल्स संघाने यावेळी चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीच्या अखेरीस प्लेऑफमध्येही पोहोचतील. (Photo- IPL/BCCI)

5 / 6
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघ चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे पंजाब किंग्सही प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. प्लेऑफ फेरीत पंजाबकडूनही आपण अपेक्षा करू शकतो, असे पियुष चावला म्हणाला.(Photo- IPL/BCCI)

6 / 6
मुंबई इंडियन्स देखील चौथ्या संघ म्हणून प्लेऑफ फेरीत पोहोचू शकतो. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने सलग सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचेल, असा अंदाज पियुष चावला यांनी वर्तवला आहे. (Photo- IPL/BCCI)