इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू असताना पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना पाठवलं घरी, प्रशिक्षकांना नोकरीवरून काढून टाकलं

इंग्लंड पाकिस्तान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यातच पाकिस्तानच्या वाटेला पराभव आला. आता क्लिन स्विपची भीती सतावत आहे. असं असताना पाकिस्तानने तीन खेळाडूंना थेट घरी पाठवलं आहे. तर प्रशिक्षकाला नोकरीवरून काढून टाकलं.

| Updated on: Aug 31, 2026 | 8:30 PM
1 / 5
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यानंतरच पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला आहे. कारण दोन्ही कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. असं असताना पीसीबीने तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इतकंच काय तर दोन प्रशिक्षकांना नोकरीवरून काढलं आहे.  (PC-PTI)

2 / 5
सलमान अली आगाला पाकिस्तान संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्यासाठी बर्मिंघमला जाणार नाही. इतकं काय तर इमाम उल हक आणि मोहम्मद रिझवान यांनाही घरी पाठवलं आहे. सलमान आगा पहिल्या कसोटी खेळला होता आणि दोन्ही डावात मिळून 25 धाव केल्या होत्या.  रिझवानने दोन सामन्यातील चार डावात 61 धाव केल्या. इमाम दुसऱ्या सामन्यात फलंदाजीला उतरलाच नाही.  (PC-PTI)

3 / 5
रिपोर्टनुसार, या तिघांना संघातून वगळल्यानंतर त्यांची जागा सईम अय्यूब, अराफात मिन्हास आणि अब्दुल्लाह फजल घेणार आहे. या तिघांना इंग्लंडला जाण्यास सांगितलं आहे. आता या तिघांपैकी प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  (PC-PTI)

4 / 5
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पराभवानंतर कोचिंग स्टाफवरही कारवाई करण्यात आली आहे. सरफराज अहमद आणि उमर गुल यांना काढून टाकलं आहे. त्यांच्या जागी माइक हेसन यांच्याकडे कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे. माइक हेसन यांच्याकडे वनडे आणि टी20 संघाची धुरा होती. आता कसोटीची जबाबदारीही आली आहे. तर गोलंदाज प्रशिक्षक म्हणून एश्ले नॉफ्की यांची नियुक्ती केली आहे.  (PC-PTI)

5 / 5
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याला अजून बराच अवधी आहे. 9 सप्टेंबरला एजबेस्टनमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. खरं तर हा सामना औपचारिक असणार आहे. कारण मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने गमावल्याने आधीच मालिका गमावली आहे. पण क्लिन स्विप मिळू यासाठी तिसरा सामना जिंकणं किंवा ड्रॉ करणं भाग आहे.   (PC-PTI)

Follow Us