WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारे 5 फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?
Most Sixes in WTC History : आयपीएल 2026 नंतर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात 4 जूनपासन कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. तर 6 जूनपासून टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना होणार आहे. यानिमित्ताने wtc स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा यशस्वी जैस्वाल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. यशस्वीने 28 सामन्यांमधील 53 डावांत 43 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

यशस्वीनंतर दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा विद्यमान कसोटी कर्णधार शुबमन गिल चौथ्या स्थानी आहे. शुबमनने 40 कसोटी सामन्यांमधील 73 डावांत 46 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. रोहितने या स्पर्धेतील 40 कसोटी सामन्यांत 56 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत WTC स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतने 71 डावांत 77 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

तसेच WTC स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नावावर आहे. स्टोक्सने 61 कसोटी सामन्यांमधील 113 डावांत 86 सिक्स ठोकले आहेत. (Photo Credit : England Cricket)