
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि युएई या संघात आमनासामना झाला. या सामन्यात भारताने 50 षटकात 6 गडी गमवून 433 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने या सान्यात आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. (Photo- ACC/Asian Cricket)

वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्ध 95 चेंडूंचा सामना केला आणि एकण 171 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 14 षटकार मारले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाच्या मायकल हिलचा 17 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. (Photo- ACC/Asian Cricket)

मायकल हिलने युथ वनडे सामन्यात 2008 मध्ये नामिबियाविरुद्ध 12 षटकार मारले होते. हा विक्रम गेली 17 वर्षे अबाधित होता. मात्र आता हा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाला आहे. त्याने एकूण 14 षटकार मारले आहेत. (Photo- ACC/Asian Cricket)

वैभव सूर्यवंशी फॉर्मात असून त्याने कमी वयातच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातही शतकी खेळी केली होती. आशिया कप रायझिंग सुपरस्टार्स स्पर्धेत युएईविरुद्ध 42 चेंडूत 144 धावा केल्या होत्या. (Photo- ACC/Asian Cricket)

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी हा राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. आयपीएल 2025 स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्याने 7 सामन्यात 252 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता. (Photo- ACC/Asian Cricket)