
भारत आणि इंग्लंड अंडर 19 वनडे मालिका भारताने 3-2 ने आपल्या खिशात घातली. पाच सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. त्याने 71 च्या सरासरीने आणि 174.01 च्या स्ट्राईक रेटने 355 धावा केल्या. (फोटो- पीटीआय)

वैभव सूर्यवंशीने 355 धावांसह वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अंडर 19 यूथ वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या नावावर होता. (फोटो- पीटीआय)

शुबमन गिलने 2017 साली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 351 धावांची खेळी केली होती. अंबाती रायुडून 2002 मध्ये 291 धावा केल्या होत्या. आता या सर्वांना मागे टाकत वैभव सूर्यवंशी आघाडीवर आला आहे. (Photo:Michael Steele/Getty Images)

वैभव सूर्यवंशीने वनडे मालिकेत 52 चेंडूत शतक ठोकलं होतं. यूथ वनडेतील हे सर्वात वेगवान शतक आहे. तर 20 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. युथ वनडे क्रिकेटमधील दुसरं वेगवान शतक आहे. (Photo: Andy Kearns/Getty Images)

वैभव सूर्यवंशीने आयपीएल सात सामन्यातील सात डावात 206.55 च्या स्ट्राईक रेटने 255 धावा केल्या. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. आता वैभव सूर्यवंशी दोन युथ कसोटी सामन्यात काय करतो याकडे लक्ष आहे. हा सामना 12 जुलैपासून आहे. (फोटो- पीटीआय)