
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचली आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया एक वॉर्मअप सामना खेळणार आहे. हा सामना स्कॉटलँडविरुद्ध खेळणार आहे. (Photo- BCCI Twitter)

14 वर्षीय वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने कमाल केली. या मालिकेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. तसेच एक शतक आणि अर्धशतक ठोकलं. त्याच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेला 3-0 ने मात दिली. (Photo- BCCI Twitter)

वैभव सूर्यवंशीसमोर आता नवं आव्हान आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 607 चा आकडा गाठायचा आहे. वैभव सूर्यवंशीचा फॉर्म पाहता हा विक्रम मोडू शकतो. कारण आतापर्यंतच्या अंडर 19 वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम ऑयन मॉर्गनच्या नावावर आहे. त्याने दोन वनडे वर्ल्डकप खेळले आहे. तसेच 606 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

वैभव सूर्यवंशीला हा विक्रम मोडण्याची पहिली आणि शेवटची संधी आहे. कारण बीसीसीआयच्या नियमानुसार अंडर 19 वर्ल्डकप खेळण्याची संधी फक्त एकदाच दिली जाते. वैभवचा सध्याचा फॉर्म पाहता साखळी फेरीतच ही संख्या गाठू शकतो. (Photo- BCCI Twitter)

भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिका, दुसरा सामना 17 जानेवारीला बांग्लादेश, तिसरा सामना 24 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. त्यानंतर 3 आणि 4 तारखेला उपांत्य फेरी आणि 6 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल. (Photo- BCCI Twitter)