विराट कोहलीला 15 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संघात मिळाली एन्ट्री, झालं असं की…

विराट कोहलीने कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. असं असताना आता त्याच्यावर देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचा दबाव वाढला होता. आता विराट कोहली यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे.

| Updated on: Dec 11, 2025 | 7:10 PM
1 / 5
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. डीडीसीएने विराट कोहलीचा संभाव्य विजय हजारे संघात समावेश केला आहे. विराट कोहलीच नाही तर ऋषभ पंतचाही दिल्ली संघाच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश आहे. (फोटो- पीटीआय)

2 / 5
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचे निश्चित झाले होते. वृत्तानुसार, तो दिल्लीकडून तीन सामन्यांमध्ये खेळू शकतो. कोणत्या तीन सामन्यात खेळणार हे स्पष्ट नाही. (फोटो- ट्वीटर)

3 / 5
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने भाग घेणं खूपच खास असणार आहे. कारण विराट कोहली 15 वर्षांनी या स्पर्धेत खेळणार आहे. कोहलीने शेवटचा 2010 मध्ये या स्पर्धेत खेळला होता. (फोटो- पीटीआय)

4 / 5
विराट कोहलीने 13 विजय हजारे सामने खेळले आहेत, यात त्याने 819 धावा केल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोहलीने चार शतके केली आहेत. त्यामुळे आता या पर्वात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. (फोटो- पीटीआय)

5 / 5
2027 चा वनडे वर्ल्डकप स्पर्धा विराट कोहलीच्या समोर आहे. अहवालांनुसार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये निवडीसाठी त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान विराट कोहलीने स्पष्टपणे सांगितले होते की, त्याची तयारी शारीरिकपेक्षा मानसिक जास्त आहे. (फोटो- पीटीआय)