
विराट कोहलीने टी20 आणि कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली त्यासाठीच खेळत होता. पण या स्पर्धेत दोन सामने खेळणार अशी माहिती होती. पण आता आणखी एक सामना खेळणार आहे. (Photo- PTI)

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली सांगितलं की, विराट कोहली या स्पर्धेत आणखी एक सामना खेळणार आहे. विराट कोहली 6 जानेवारीला बंगळुर्चाय बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये रेल्वेविरुद्ध सामना खेळेल. या स्पर्धेतील विराट कोहलीचा तिसरा सामना आहे. (Photo- PTI)

न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करण्यासाठी आणखी एक सामना खेळू इच्छित आहे. त्यामुळे 6 जानेवारीला होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. (Photo- PTI)

विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. एका सामन्यात त्याने 131 आणि दुसऱ्या सामन्यात त्याने 77 धावा केल्या आहेत. या खेळींमुळे दिल्लीला विजय मिळवून देण्यातही मदत झाली. आता त्याचा हा फॉर्म न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही दिसावा अशी इच्छा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. (Photo- PTI)

डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी पीटीआयला सांगितले की, "सध्या तो खेळत आहे. विराटने तीन सामन्यांसाठी त्याची उपलब्धता निश्चित केली आहे." दरम्यान, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय एकदिवसीय संघ 8जानेवारीपर्यंत वडोदरा येथे जमेल आणि कोहली एक दिवस आधी येऊन सराव सुरू करू शकतो. (Photo- PTI)