ब्रिटिशांच्या भूमित भारतीयाचा धुमाकूळ, या क्रिकेटपटूनं नेमकं काय केलं?

| Updated on: Oct 01, 2022 | 5:59 PM

राजकोटमध्ये चेतेश्वरची स्टार फलंदाजी पाहण्यासाठी लोक उत्सुक आहे.

1 / 5
इंग्लंडमध्ये सध्या भारतीय खेळाडू चांगलीच धुमाकूळ घालताय. यात चेतेश्वर पुजाराचं नाव अग्रक्रमावर आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या चेतेश्वर पुजाराला आपल्याच घरात धावांची आस लागली आहे. सौराष्ट्र आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील इराणी ट्रॉफी सामन्याला आजपासून राजकोटमध्ये सुरुवात झाली आहे.

2 / 5
राजकोटमध्ये चेतेश्वरची स्टार फलंदाजी पाहण्यासाठी लोक उत्सुक आहे. पण, पुजारा मैदानात येताच पॅव्हेलियनमध्ये परतलाय. रॉयल लंडन एकदिवसीय चषकात चेतेश्वरनं 3 शतके आणि 2 अर्धशतके झळकावून आपला फॉर्म दाखवलाय.

3 / 5
इंग्लंडमध्ये 2 महिने खेळल्यानंतर पुजारा भारतात खेळण्यासाठी आला आणि 1 धावांवर बाद झाला. कुलदीप सेननं भारतीय स्टारला हनुमा विहारीकडून  झेलबाद केलं. पुजाराला केवळ 4 चेंडूंचा सामना करता आला.

4 / 5
सौराष्ट्रचा संपूर्ण संघ 25 षटकांत 98 धावांत गारद झाला. रेस्ट ऑफ इंडियाच्या मुकेश कुमारने 4, कुलदीप सेन आणि उमरान मलिकने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. पुजाराबद्दल सांगायचं झाल्यास गेल्या दोन महिन्यांपासून त्यानं इंग्लंडमध्ये धुमाकूळ घातलाय.

5 / 5
ससेक्ससाठी आधी कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वन आणि नंतर रॉयल लंडन वन डे चषकात चेतेश्वरनं गोलंदाजांचा धुव्वा उडवला.