AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात टॅनिंगची भीती वाटतेय? स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा, त्वचा राहील निरोगी

तुम्हालाही उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल आणि ती टॅनिंगपासून वाचवायची असेल, तर संत्र्यांच्या सालाच्या पावडरमध्ये स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या या गोष्टी मिक्स त्वचेवर लावा. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात टॅनिंगची भीती वाटतेय? स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थ मिक्स करून लावा, त्वचा राहील निरोगी
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Mar 18, 2026 | 5:53 PM
Share

उन्हाळा सुरू होताच टॅनिंगच्या समस्येची भीती सर्वांनाच असते. कडक उन्हाचा सर्वाधिक परिणाम चेहरा, पाय, मान आणि हातांवर होतो. केवळ त्वचा काळी पडत नाही तर उष्णता आणि घामामुळे चेहऱ्यावर मुरुमे देखील येतात. आयुर्वेद अशा स्क्रबची शिफारस करतो जो उन्हाळ्यात टॅनिंगपासून आराम देईलच, शिवाय चेहरा चमकदारही ठेवेल. चला तर मग आजच्या लेखात आपण घरगुती पद्धतीने तयार केलेल्या फेसमास्कबद्दल जाणून घेऊयात.

त्वचा का काळवंडते?

टॅनिंग ही उन्हाळ्यातील एक सामान्य समस्या आहे जी त्वचेला काळे करते. सतत सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी त्वचा मेलेनिन नावाचा हार्मोन तयार करते आणि कालांतराने, रंग असमान होतो. योग्य काळजी घेतल्यास टॅनिंग दूर करता येते. टॅनिंग काढून टाकण्यासाठी संतुलन आणि पोषण आवश्यक आहे. आयुर्वेद अनेक प्रभावी त्वचेची काळजी घेणारे उपाय देतो, त्यापैकी एक म्हणजे नैसर्गिक फेसपॅक.

टॅनिंग काढण्यासाठी नैसर्गिक फेसपॅक

नैसर्गिक फेसपॅक बनवणे देखील सोपे आहे. संत्र्याच्या सालीची पावडर, थोडे केशर, ज्येष्ठमध पावडर आणि चंदन पावडर हे सर्व समान प्रमाणात घेऊन कोरफड जेलमध्ये मिक्स करून पेस्ट तयार करा. जर पेस्ट घट्ट वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुलाबपाणी किंवा कच्चे दूध मिक्स करू शकता. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा टॅन झालेल्या भागावर लावा. ज्यामुळे टॅनिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते.

नैसर्गिक फेसपॅकचे फायदे

हा नैसर्गिक फेसपॅक मृत पेशी काढून त्वचा स्वच्छ करण्याची क्षमता ठेवतो. तसेच हा फेसपॅक त्वचेचा रंग एकसमान करण्यास आणि त्वचेला खोलवर पोषण देण्यास मदत करतो. कारण यात वापरण्यात आलेले ज्येष्ठमधाची पावडर मेलॅनिनचे संतुलन राखतो आणि केशर त्वचा उजळ करण्यास मदत करते. या मिश्रणातील कोरफड जेल ही उष्णतेपासून आराम देते आणि त्वचेला खोलवर थंडावा देऊन त्वचेची जळजळ कमी करते. संत्र्याच्या सालीची पावडर व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते, जे नवीन त्वचेच्या पेशींच्या निर्मितीस मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....