भारत आणि पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंच्या पगारात किती अंतर? कोणाला मिळतं सर्वाधिक वेतन? जाणून घ्या
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. असं असताना भारतीय हॉकी खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंच्या तुलनेत किती मानधन मिळत असावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहे. मग खेळ कोणताही असो.. दोन्ही संघ आमनेसामने आले की आक्रमकता दिसून येते. हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या मानधनातील फरक समजून घेऊयात..(Photo: PTI/Getty)

भारत आणि पाकिस्तानी हॉकी खेळाडूंचा पगार निश्चित नाही. पण या दोन्ही संघांच्या खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांमध्ये प्रचंड तफावत आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ सरस आहे. (Photo: PTI/Getty)

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतातील अव्वल खेळाडूंना 50 हजारांपर्यंत मानधन मिळतं. तर उदयोन्मुख खेळाडूंना 25 हजारांपर्यंत मानधन मिळते. याशिवाय बहुतांश हॉकी खेळाडू भारत सरकारच्या रेल्वे, बँका आणि तेल कंपन्यामध्ये नोकरी करतात.(Photo: PTI/Getty)

रिपोर्टनुसार, भारतीय हॉकी खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी खेळाडूंना टीम कॅम्पदरम्यान दररोज 1000 पाकिस्तानी रुपयांचा भत्ता मिळतो. यापूर्वी हा भत्ता 3000 पाकिस्तानी रुपये होता. मात्र आता त्यात घट केली आहे. तसेच आता मिळणारा 1000 रुपयांचा भत्ता देखील निश्चित नाही. (Photo: PTI/Getty)

पाकिस्तानचे माजी हॉकीपटू आणि कर्णधार अख्तर रसूल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, पाकिस्तान सरकारने हॉकीपटूंच्या सरकारी नोकऱ्याही रद्द केल्या आहेत. त्यामुळे भारतीय हॉकीपटूंच्या पाकिस्तानी हॉकीपटूंची स्थिती खूपच बिकट आहे. (Photo: PTI/Getty)