IPL 2026: आयपीएलच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वाधिक धावांनी विजय मिळवला? जाणून घ्या विक्रमाबाबत

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण आतापर्यंत आयपीएल इतिहासातील विक्रमांची चर्चा मात्र गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. असाच एक विक्रम सर्वाधिक धावांनी विजय मिळवलेल्या संघाबाबत आहे. चला जाणून घेऊयात

| Updated on: Mar 25, 2026 | 6:29 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी दहाही संघ कसून सराव करत आहे. दोन महिने जेतेपदासाठी आता चुरस पाहायला मिळणार आहे. असं असताना या स्पर्धेत मोठा विजय मिळवणारा संघ कोणता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Photo- IPL/BCCI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) या संघात 146 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात मुंबईने 212 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीचा संघ 13.4 षटकात 66 धावांवर बाद झाला होता. (Photo- IPL/BCCI)

3 / 5
सर्वाधिक धावांनी विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत आरसीबीचा संघ दुसर्‍या स्थानावर आहे. आरसीबीने 2016 मध्ये गुजरात लायन्स संघाला 144 धावांनी नमवलं होतं. तेव्हा आरसीबीने 248 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. (Photo- IPL/BCCI)

4 / 5
तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स संघ आहे. 2008 मध्ये केकेआरने आरसीबीला 140 धावांनी पराभूत केलं होतं. स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात हा विक्रम नोंदवला गेला होता. (Photo- IPL/BCCI)

5 / 5
आरसीबीचा संघ या यादीत चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबला 138 धावांनी, तर 2013 मध्ये पुणे वॉरियर्स संघाला 130 धावांनी नमवलं होतं. 2013 मध्ये आरसीबीने 263 धावा केल्या होत्या. (Photo- IPL/BCCI)

Follow Us