
वुमन्स प्रीमियर लीग 2026 चा दुसरा सामना आज गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीची संधी दिली. यात गुजरात संघाने 208 धावांचे मोठे लक्ष्य दिले. यूपी वॉरियर्स 197 धावांपर्यंत मजल मारू शकला आणी १० धावांनी पराभव पत्करावा लागला. (Photo: BCCI/WPL)

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा सामना एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स असा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने विक्रमी 207 धावा केल्या. वुमन्स प्रीमियर लीगमधील गुजरातचा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. गुजरातची याआधीची सर्वोच्च धावसंख्या 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 7 बाद 201 होती. (Photo: BCCI/WPL)

यूपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य होते, परंतु 20 षटकांत 8 बाद 197 धावाच करता आल्या. गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या दोघांनाही अद्याप डब्ल्यूपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. या स्पर्धेत दोन्ही संघाच्या मिळून 400 पार धावा झाल्या. दोन्ही संघांच्या मिळून 404 धावा झाल्या. या स्पर्धेतील दुसरी सर्वाधिक धावसंख्या आहे. यापूर्वी 2025 मध्ये आरसीबी आणि युपी वॉरियर्स संघाच्या मिळून 438 धावा झाल्या होत्या. (Photo: BCCI/WPL)

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सलग तीन सामने गमावल्यानंतर डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सचा हा पहिला विजय आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी यूपी वॉरियर्सचा सहा सामन्यांमधील चौथा पराभव आहे. गुजराज जायंट्सने 2023 मध्ये पहिल्या सामन्यात पराभव, 2024 मध्ये पहिल्या सामन्यात पराभव आणि 2025 मध्ये पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं होतं. (Photo: BCCI/WPL)

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील या सामन्यात 21 षटकार मारले गेले. या स्पर्धेच्या इतिहासातील मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.2024 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात 19 आहेत. युपी वॉरियर्सचे 11 षटकार मारले, हे स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक मारलेले संयुक्त षटकार आहेत. (Photo: BCCI/WPL)