
क्रिकेट चाहत्यांना वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या हंगामाची प्रतिक्षा आहे. या स्पर्धेत एकूण 4 संघात एका ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्सनंतर आणखी एका फ्रँचायजीने आपल्या संघाच्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. युपी वॉरियर्सने नव्या कर्णधाराचं नावं जाहीर केलं आहे. (Photo Credit: PTI)

यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाची दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार मेग लेनिंग हीला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. मेगने आतापर्यंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व केलं आहे. आता मेग यूपीचं नेतृत्व करणार आहे. (Photo: UP Warriorz)

यूपी वॉरियर्सने 4 जानेवारीला आपल्या नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं. कर्णधारपदासाठी दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टन यांचही नाव चर्चेत होतं. मात्र लेनिंगने बाजी मारली. (Photo: PTI)

मेगची डब्ल्यूपीएल स्पर्धेत नेतृत्व करण्याची ही सलग आणि एकूण चौथी वेळ असणार आहे. मेगने पहिल्या 3 हंगामात दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व केलं. तसेच मेगने ऑस्ट्रेलियाला 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन केलंय. इतकंच नाही तर मेगच्या नेतृत्वात दिल्लीने सलग तिन्ही हंगामात अंतिम फेरीत धडक दिलीय. मात्र मेग कॅप्टन म्हणून तिन्ही वेळेस दिल्लीला ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरली. (Photo: PTI)

यूपीआधी गुजरात जायंट्सने एश्ले गार्डनर हीला कर्णधार केलं. तर दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीला नेतृत्वाची सूत्र दिली. (Photo: PTI)