
देश आणि जगातील अनेक कंपन्या फ्लाइंग कार आणि एअर टॅक्सी सेवेच्या तयारीत गुंतल्या आहेत. दरम्यान, फ्रान्समधील एका कंपनीच्या मते, ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये जगातील पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी लॉन्च करू शकते.

पॅरिस एअरपोर्ट ऑपरेटर ग्रुपचे वरिष्ठ अभियंता सोलेन ब्रिस यांनी सांगितलं की, कंपनी जगातील पहिले एअर टॅक्सी नेटवर्क तयारी करत आहे. कंपनी यासाठी व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग सेवा सुरू करणार आहे. या एअरटॅक्सीला 5 व्हर्टीपोर्ट असतील. एका वेळी एक पायलट आणि फक्त एक प्रवासी एअर टॅक्सीमध्ये प्रवास करू शकणार आहे.

एअर टॅक्सी पॅरिसच्या हवाई टर्मिनल्स दरम्यान हेलिकॉप्टर उड्डाण करणारे मार्ग वापरेल. या सेवेचा उपयोग वैद्यकीय गरजांसाठी केला जाईल. हृदयविकाराच्या रुग्णांना सर्वाधिक फायदा होईल.

भारतातही एअर टॅक्सीची तयारी सुरू आहे. अलीकडेच, बंगळुरूच्या बाहेर येलाहंका एअरफोर्स स्टेशन परिसरात झालेल्या एरो इंडिया शोमध्ये लोकांनी याची झलक पाहिली.

एअर टॅक्सी ताशी 160 किमी वेगाने 200 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. व्हर्टिकल टेकऑफ आणि लँड करू शकते. 200 किलो वजन उचलण्याची क्षमता असलेल्या या एअर टॅक्सीमध्ये दोन लोक चढू शकतात. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केले जाईल, असे सांगितले जात आहे.