तर महाराष्ट्र सोडून जा; मराठा आंदोलकांबाबत पोस्ट करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले

Maratha Reservation: एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मराठा आंदोलकांबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने ही पोस्ट काही वेळातच डिलिट केली. पण आता या अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

| Updated on: Sep 01, 2025 | 4:34 PM
1 / 7
मुंबईतील आझाद मैदानात मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

2 / 7
तसेच मुंबईतील इतर परिसरात देखील मराठा आंदोलक असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, एका अभिनेत्रीने तिला आलेल्या अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, ही पोस्ट पाहिल्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

3 / 7
कपिल शर्मा शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सुमोना चक्रवर्तीने मराठा आंदोलकांबाबत पोस्ट शेअर केली होती. दक्षिण मुंबईत भरदिवसा मला माझ्या कारमध्येही असुरक्षित वाटत होतं असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.

4 / 7
सुमोनाला ट्रोल करायला सुरुवात केल्यावर तिने ही पोस्ट डिलिट केली. पण नेटकरी इथेच थांबले नाहीत. त्यांनी सुमोनाच्या इतर फोटोंवर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

5 / 7
एका यूजरने, 'जिथं तुला सुरक्षित वाटत तिथं जा मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे बाहेरून येऊन शहाणपण शिकवू नये' असे म्हटले.

6 / 7
तर दुसऱ्या एका यूजरने, 'एवढा त्रास होत असेल तर महाराष्ट्र सोडून जा' असा सल्ला दिला आहे. तिसऱ्या एका यूजरने 'मुंबई मराठ्यांची आहे' असे म्हटले आहे.

7 / 7
सध्या सोशल मीडियावर सुमोनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.