
वर्ल्ड कपमध्ये मोठा भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा वन डे मधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडणार आहे. याबाबत माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करण्याता रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये 48 शतके केली आहे. हा विक्रम मोडण्यापासून सचिन अवघी दोन शतके दूर आहे. विराट हा विक्रम कधी मोडणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

सचिनचा हा विक्रम कधी मोडला जाणार याबाबत माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केलीये. गावसकरांनी वर्ल्ड कपधील एक सामना सांगितला असून त्या संघाविरूद्ध विराट विक्रम मोडेल असं त्यांना वाटत आहे.

विराट कोहली त्याच्या वाढदिवसादिवशी वन डे मधील सर्वाधिक शतक असलेला सचिनचा रेकॉर्ड मोडेल, अशी भविष्यवाणी गावसकरांनी केली आहे.

दरम्यान, ५ नोव्हेंबरला भारताचा दक्षिण आफ्रिका संघासोबत भारताचा सामना असून विराट त्याचं 50 वं शतक पूर्ण करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डनवर होणार आहे. r